पाटीदार नेते हार्दिक पटेल येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक यांनी अलीकडेच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. दरम्यान येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा हार्दिक पटेल यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला मात्र पटेल यांच्यामुळे मोठा फायदा होणार आहे.
Hardik Patel to join BJP on 2nd June – he confirms to ANI. He had recently quit Congress. pic.twitter.com/xtgGjQ9hhm
— ANI (@ANI) May 31, 2022
हार्दिक पटेल यांना भाजपमध्ये काय जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शिवाय पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित प्रवेश करणार की राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थित प्रवेश करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य नेतृत्वाला वैतागून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी राज्य नेतृत्वावर टीका करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती.
अयोध्येतील रामाचे मंदिर असो, नागरिकत्व कायदा-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे असो किंवा जीएसटी लागू करण्याचा निर्णय असो, देशाला दीर्घ काळापासून त्यावर तोडगा हवा होता, पण काँग्रेस पक्ष फक्त त्यात अडथळा बनण्याचे काम करत राहिला. अशी टीका पटेल यांनी कॉंग्रेसवर केली होती.