अकलूज- खंडाळी-दत्तनगर (ता. माळशिरस) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी (दि २९) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सामाजिक
कार्यक्रमात खंडाळी पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था व
छत्रपती संभाजी राजे ग्रुप, दत्तनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. दत्तनगर येथील अंबिका मंदिर सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा तसेच विविध आजारांचे वाढतं प्रमाण लक्षात घेता या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या उपक्रमास हातभार लावावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.