यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला 19 मे रोजी दोषी ठरवले होते. यासीनच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने लव्ह मॅरेज केले आहे. त्याची पत्नी मुशाल हुसैन मलिक ही पाकिस्तानची रहिवासी आहे. दोघेही पाकिस्तानातच भेटले होते. यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले.
यासिनची पत्नी 20 वर्षांनी लहान –
यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिकचा जन्म 1986 मध्ये कराची, पाकिस्तानमध्ये झाला. तर यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी झाला. म्हणजे मुशाल यासिनपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.
मुशाल श्रीमंत कुटुंबातील –
मुशालचे वडील एमए हुसेन हे पाकिस्तानचे प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. मुशालची आई रेहाना या पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या. मुशालचा भाऊ अमेरिकेत परराष्ट्र धोरण विश्लेषक आहे.
2005 मध्ये झाली होती दोघांची भेट –
मुशाल आणि यासीन यांची 2005 मध्ये भेट झाली होती. त्यावेळी यासिन भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तानात गेला होता, असे सांगितले जाते. एका रॅलीत भाषण करून यासीन बाहेर आला तेव्हा मुशाल त्याला भेटायला आली. मुशालने यासिनचा ऑटोग्राफ घेतला. मुशालने एका मुलाखतीतही याचा उल्लेख केला होता. म्हणाली होती, ‘मला यासिनचे भाषण आवडले. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याचा ऑटोग्राफ घेतला.
यासीनने असं व्यक्त केलं प्रेम –
2005 नंतर मुशाल आणि यासीन यांच्यातील भेट वाढत गेली. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशालने सांगितले होते की, एके दिवशी यासीन मला म्हणाला, ‘मला पाकिस्तान खूप आवडतो आणि विशेषत: तु खूप आवडते.’
आईने ठरवले लग्न –
मुशालच्या आईला दोघांची लव्हस्टोरी कळली. यानंतर मुशालची आई यासीनसोबत हज यात्रेला गेली. येथे तिने दोघांचे लग्न निश्चित केले. दोघांनी 2009 मध्ये लग्न केले.
दोघांना एक मुलगी आहे –
2009 मध्ये लग्नानंतर यासीन आणि मुशाल पाकिस्तान आणि दुबईमध्ये वारंवार भेटू लागले. 2012 मध्ये दोघांना एक मुलगी झाली. रझिया सुलतान असे तिचे नाव आहे.
सुटकेची मागणी –
19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवल्यानंतर मुशालने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. यामध्ये ती यासिनच्या सुटकेची मागणी करत राहिली.