मुंबई – आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ‘मसणात जावे’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांना त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही त्यावर भाष्य केले आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं! अशी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी भाजप नेते चंद्रकात पाटलांनी केलेल्या वक्तव्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.