राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांताराम कटके यांचे आश्वासन
वाघोली : वाघोली केसनंद रोड वरील मिकासा हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विविध प्राथमिक सोयी-सुविधा यांचा अभाव व इतर तक्रारींचे निवारण करण्या संबंधीचे निवेदन सोसायटीचे चेअरमन प्रकाश संसारे व सर्व सोसायटी सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांताराम कटके यांना भेटून दिले. या समस्या बांधकाम व्यवसायिक यांच्याशी भेटून सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांताराम कटके यांनी दिले.
वाघोली केसनंद रोड वरील मिकासा सोसायटी मधील नागरिकांनी विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलन केले होते.यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी मराठे यांना शांताराम कटके संदिप सातव यांच्या उपस्थित सोसायटी कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी चेअरमन प्रकाश संसारे, सेक्रेटरी दीपिका कुन्नुर, व्हाईस चेअरमन मनीष गायकवाड, माजी उपसरपंच संदिप सातव, मनीषा मांडे, अविनाश वासानी, परेश गंगे, दिलीप मांडे, विकास तिवारी,देवेंद्र जैन, विजय शर्मा ,स्वप्निल डांगे, तिमिर चक्रवती , मयुर ठक्कर, अजिंक्य साळुंखे, संतोष पटेल ,ओम प्रकाश केंद्रे, गोपाल पाटील, प्रशांत शिरोडे ,राहुल मोरे , जयश्री घोडके , कल्पना साळुंखे , सविता तिवारी, अर्जुन पलेगट्टू , विकास वनगारे ,आदी उपस्थित होते.