मुंबई – आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रा रातोरात फिल्मी जगतात प्रकाशझोतात आली. दरम्यान अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या कामातून ब्रेक घेतला असून ती सुट्टीसाठी मालदीवमध्ये आली आहे. यावेळी अभिनेत्री खूपच रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर सोनेरी क्षण घालवताना, पाण्यात माशांमध्ये पोहताना, अभिनेत्रीने चाहत्यांसाठी अनेक आनंदी छायाचित्रे शेअर करून तिच्या उत्साह दाखवला आहे. सध्या अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री लेपर्ड प्रिंट बिकिनी परिधान केलेली दिसून आली आहे.
View this post on Instagram
मालदीवचे अनेक फोटो सान्या मल्होत्राने शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये अभिनेत्रीने बिकिनी लूकमध्ये दिसून आली आहे. तिच्या याच फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्वरित फोटोमध्ये अभिनेत्रीने निसर्गाचे सुंदर दृश्य आपल्या चाहत्यांना दाखवले आहे. सान्याच्या या फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक दिसत आहे. तर कुठे ती मासे आणि कासवांमध्ये पाण्यात पोहताना दिसत आहे. मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना सान्याने प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, या फोटोवरून ती मोकळेपणाने जगताना दिसत आहे.
दरम्यान सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या आधी सान्याने ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर सान्याचा आयुषमान खुरानासोबत असलाला ‘बधाई हो’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.