पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस’ वेवर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विकेण्ड असल्याने द्रुतगती मार्गावर बोरघाटाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहने ही संथगतीने पुढे सरकत आहेत.
शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस आले अशात सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी जोडून आली आहे. सलग तीन सुट्ट्यांचे औचित्य साधत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आता गर्दीचा सामना करावा लागत आहे.
एक्स्प्रेस’ वेवर आज सकाळी टेम्पोचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे गाडी बंद पडली, यामुळे टेम्पोच्या मागे असलेल्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. त्यातच विकेण्ड असल्यामुळे मुंबईवरुन पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वर इथे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक्स्प्रेसवेवर वाहनांचा लोड पाहायला मिळतो.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृकांजन पुलाजवळ वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली आहे. विकेण्ड आणि सुट्ट्यांमुळे प्रवासी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनं धीम्या गतीने जात आहेत. क