पुणे – सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शहरातील एक सदनिका मंगळवारी जप्त केली. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे एका ट्रस्टच्या मिळकतीची विक्री करून आलेली 7 कोटी 17 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
शहरातील ताबूत इमाम एंडाउन्मेंट ट्रस्टची (टीआयइटी) मिळकत बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. याप्रकरणी इम्तियाज मोहम्मद हुसेन, चांद रमजान मुलाणी, सतीश राजगुरू, संतोष कांबळे, मोहम्मद इशारक शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे ट्रस्टचे विश्वस्त असल्याचे भासवून मिळकतीची शासनाला 8 कोटी 67 लाख रुपयांना विक्री केली होती.
आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत ट्रस्टच्या नावे खाते उघडले होते. आरोपींनी या पैशांतून दीड कोटी रुपयांची सदनिका खरेदी केली होती. या प्रकरणात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडीकडून चौकशी
करण्यात आली