मुंबई – देशासह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा सहन करावा लागला, त्याची किंमत तेल कंपन्या आता दररोज दर वाढवून सर्वसामान्यांकडून वसूल करत आहेत.
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे किती भडका निर्माण झाला आहे ते…
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
रत्नागिरी – पेट्रोल १२१.७९ रुपये / डिझेल १०४.४६ रुपये
यवतमाळ – पेट्रोल १२१.५० रुपये / डिझेल १०४.१८ रुपये
वाशिम – पेट्रोल १२१.०१ रुपये / डिझेल १०३.७१ रुपये
वर्धा – पेट्रोल १२०.६५ रुपये / डिझेल १०३.३७ रुपये
पुणे – पेट्रोल ११९.९८ रुपये / डिझेल १०२.६८ रुपये
नाशिक – पेट्रोल १२०.८९ रुपये / डिझेल १०३.५६ रुपये
मुंबई शहर – पेट्रोल १२०.५१ रुपये / डिझेल १०४.७७ रुपये
सातारा – पेट्रोल १२०.५१ रुपये / डिझेल १०३.५० रुपये