नवी दिल्ली – राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलीच गोंंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. एकीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार होत्या. त्यामध्ये ते यशस्वी झाले नसून राणा दांपत्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. दुसरीकडे या वादात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या फहमिदा हसन यांनी आता दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे विधिवत पठण करण्याची घोषणा केली आहे. हसन यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा, नमाज, नवकार मंत्र, गुरुग्रंथ आणि इतर दैवी स्तुतीचे पठण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी हे पत्र ट्विटही केले आहे.
फहमिदा हसन म्हणाल्या की, त्या नेहमी घरात हनुमान चालीसा आणि दुर्गा पूजा करतात. मात्र देशात ज्या प्रकारे महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. ते पाहता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपेतून जागे करणे गरजेचे झाले आहे. फहमिदा हसन यांच्या मते जर नवनीत राणा व रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन केल्याने महाराष्ट्राचा फायदा दिसत आहे तर देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसासह अनेक वेगवेगळ्या प्रार्थना करणे आवश्यक आहे.