मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ आपल्या आगामी “धर्मवीर’ सिनेमातून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणार्या ‘आनंद दिघे’ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. मंगेश देसाई या सिनेमाची निर्मिती करणार आहे. नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे, ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य सिनेमा येणार आहे. “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून आनंद दिघे याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
View this post on Instagram
ट्रेलरच्या सुरुवातीला “कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी.. या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा…” हे डायलॉग ऐकायला येतात. सिनेमाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश ओकचा लूक आहे. ‘प्रसाद ओक’ला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद दिघे यांची आठवण येईल. ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.