मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सतत टीका नवनीत राणा करत असतात. त्यांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार राणा यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नवनीत राणा बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्या सातत्याने प्रखर टीका करत असतात. खासदार नवनीत राणा यांच्यासोबत यापुढे 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार.