कोलोंबो – आर्थिक संकटावरून अडचणीत आलेल्या श्रीलंकेला भारत सरकारने 40 हजार मेट्रीक टन डिझेलची मदत केली आहे. गेल्या 50 दिवसांपासून भारताने 2 लाख मेट्रीक लीटर इंधनाची मदत श्रीलंकेला केली आहे.
आता 500 दशलक्ष डॉलरच्या लाईन ऑफ क्रेडिटवर 40 हजार मेट्रीक टन डिझेलची मदत श्रीलंकेला केली गेली आहे, असे श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
उर्जा टंचाईमुळे श्रीलंकेत शुक्रवारी मोठ्या असंतोषाला सुरूवात झाली. त्यामुळे तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने श्रीलंकेला लाईन ऑफ क्रेडिटच्या आधारे श्रीलंकेला केलेली ही चौथी मदत आहे.