पुणे – निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे निधन झाले. 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरोळे हे गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. तसेच धनकवडी संपर्क प्रमुख, सेवा प्रबोधीनी उपाध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सदस्य, पतित पावन संघटना, समाजिक समरसता मंच अशा अनेक संघटना व कार्यात ते सक्रिय होते. निवृत्ती आप्पा इरोळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुळे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.