मुंबई – अतिशय सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री रिचा चढ्ढा आज बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीला एकाहून एक चित्रपट दिले आहेत. दरम्यान बॉलिवूडनंतर आता रिचा हॉलिवूडमध्येही नाव कमावण्याच्या तयारीत आहे.
अभिनेत्री रिचा चड्डाला एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त आहे. रिचाने तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी ट्रेनिंगही सुरू केल्याचे बोलले जात आहे. सध्या ती घोडस्वारीचा सराव करत आहे.
याआधी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अली फजल देखील हॉलिवूडमधील एका बिग बजेट चित्रपटात दिसला होता, याचे अनेक व्हिडिओ आणि पोस्टर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या चित्रपटात त्याने वेगळी भूमिका साकारली होती. रिचाने अलीच्या अभिनयाचे खूप कौतुकही केले होते. त्यानंतर असे बोलले जात आहे की हॉलिवूडमध्ये तिचा प्रियकर अली फजलच्या यशानंतर रिचालाही आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.