मुंबई – चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. या दिवशी सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देतात.
आज महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गुढीपाढव्याची धामधूम पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील एक खास संदेश शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
“गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी नकारात्मकतेवर मात करून नव संकल्पांची, यशाची आणि समृद्धीची गुढी उभारूया. येणाऱ्या नव्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुबत्ता येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो, ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!’ असे पवार म्हणाले आहेत.