पुणे – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचा सन्मान करण्यात आला. लोकमत वृत्तपत्रातर्फे दैनिक आणि दृकश्राव्य माध्यमातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारीता पुरस्कारांमध्ये छायाचित्रकार संदीप घोडके यांनी करोना काळातील छायाचित्रास हा पुरस्कार मिळाला.
लोकमतच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकुर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विविध विभागामध्ये देण्यात आलेल्यामध्ये उत्कृष्ट छायाचित्रकार संदीप घोडके, तन्मय ठोंबरे, शोधपत्रकारिता अभय खैरनार, राधेशाम जाधव, शोमेजित बॅनर्जी, पर्यावरण विषयक श्रीकिशन काळे, विजय चव्हाण, महिला विषयक अनुराधा मस्कन्हवीस, नागरी प्रश्न विषयक हिरा सरवदे, अमोल काकडे, उत्कृष्ट संपादन सुदीप डांगे, अभिजित बेल्हेकर, टीव्ही जर्नालिझम अरूण म्हेत्रे, मिकी घई, ग्राऊंड रिपोर्ट अश्विनी सातव-डोके, वैभव सोनवणे, डिजिटल जर्नालिझम इंडी जर्नल (प्रथमेश पाटील), थोडक्यात (कृष्णा वर्पे) यांना देण्यात आला.