मुंबई – अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही कंपनी खरेदी करण्यासाठी गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्या सरसावल्या आहेत.
यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून बोली लावण्याची तारीख 11 मार्च ते 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड गव्हर्नन्सच्या अभावामुळे आणि पेमेंट डिफॉल्ट असल्यामुळे 29 नोव्हेंबर रोजी आरबीआयने ही कंपनी विसर्जित केली होती.
यानंतर रिलायन्स कॅपिटल कंपनीला खरेदी करण्यासाठी वर्दे पार्टनर, मल्टिपल फंड, निप्पॉन लाइफ, जेस्सी फॉलॉवर्स, ब्रूकफिल्ड, अपोल्लो ग्लोबल आणि बॅकस्टोन आदी कंपन्या बोली लावणार आहेत.