रशियाने युक्रेनशी युद्ध घोषित केले आहे. संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले आहे. याशिवाय दुसऱ्या दिवशी ते जी-7 आणि नाटो गटातील देशांसोबत बैठक घेणार आहेत. या युद्धामुळे झालेल्या मृत्यू आणि विनाशासाठी जग रशियाला जबाबदार धरेल, असेही बिडेन म्हणाले आहेत.
राष्ट्राध्यक्ष बिडेन सध्या व्हाईट हाऊसमधून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमकडून सतत अपडेट घेत आहेत. अमेरिकेने रशियावर यापूर्वीच अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.
पुतिन यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली करून मायदेशी परतण्यास सांगितले आहे. अन्यथा हे युद्ध टाळता येणार नाही. यासोबतच रशियाने उर्वरित देशांना इशारा दिला आहे की, जर अन्य देशांनी मध्यस्ती केली तर त्यांच्यावरही प्रत्युत्तराची कारवाई केली जाईल.