नवी दिल्ली : भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आणि पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. ते ५९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लहरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Shri Bappi Lahiri Ji’s music was all encompassing, beautifully expressing diverse emotions. People across generations could relate to his works. His lively nature will be missed by everyone. Saddened by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/fLjjrTZ8Jq
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, “बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती….” या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.