अबुधाबी – युरोपीयन फुटबॉल जगतातील बलाढ्य मानल्या जात असलेल्या चेल्सीने येथे पार पडलेल्या क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. चेल्सीने अंतिम लढतीत पालमेरियास संघाचा 2-1 असा पराभव केला.
या सामन्यात चेल्सीकडून रुमेलू लुकाकुने 54 व्या मिनिटाला गोल केला व चेल्सीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पालमेरियाच्या राफेल वेगाने 63 व्या मिनिटाला गोल केला व संघाला बरोबरी मिळवून दिली.
त्यानंतर चेल्सीच्या केइ हॅवर्डसने 117 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी वाढवली. हाच गोल निर्णायक ठरला. यानंतर पालमेरिया संघाला चेल्सीचा बचाव भेदताच आला नाही.