कोल्हापूर- गुवाहाटी (आसाम) साप्ताहिक सम्मर स्पेशल रेल्वे 12 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी ही गाडी कोल्हापूर येथून पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी सुटेल व मिरज येथे पहाटे 05 वाजून 45 मिनिटांनी पोहोचुन सकाळी 06 वाजता सुटेल.
पुढे पंढरपूर, कुर्डवाडी, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, किनवट, अदिलाबाद मार्गे पिंपळखुटी, जहारपुरा, इटारसी जंक्शन, मणिपूर जंक्शन, प्रयागराज (इलाहाबाद), दीनदयाल उपाध्याय (मुघल सराई), गया, किऊल जंक्शन, मलदा टाऊन, जलपाईगुडी, या स्थानकावरून अखेर ही रेल्वे गुवाहाटी येथे शुक्रवारी पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी संध्याकाळी 05:45 वाजता गुवाहटी येथून निघून वरील मार्गाने कोल्हापूर येथे दर सोमवार सायंकाळी 5.50 पोहोचणार आहे.
सदर गाडी 12 एप्रिल 2022 पासून 7 जून 2022 पर्यंत साप्ताहिक अशा 9 फेऱ्या हाँलिडे स्पेशल म्हणुन धावेल. या रेल्वेमुळे कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी येथुन गुवाहाटी येथील माता कामाख्या देवी यांच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाली आहे.