नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांशी संवाद साधताना आज (दि. 15) एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान यांनी ’16 जानेवारी’ हा दिवस “नॅशनल स्टार- अप डे’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे. या विषयीचे एक अधिकृत ट्विट सुद्धा पंतप्रधान मोदींनी पोस्ट केले आहे.
स्टार्ट अप्सचं कल्चर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ट्विट मध्ये पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले…. “या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे.
देश के उन सभी स्टार्ट-अप्स को, सभी इनोवेटिव युवाओं को बहुत-बहुत बधाई देता हूं, जो स्टार्ट-अप्स की दुनिया में भारत का झंडा बुलंद कर रहे हैं।
स्टार्ट-अप्स का ये कल्चर देश के दूर-दराज तक पहुंचे, इसके लिए 16 जनवरी को अब नेशनल स्टार्ट अप डे के रूप में मनाने का फैसला किया गया है: PM
— PMO India (@PMOIndia) January 15, 2022
त्याचे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणं हे होय. दुसरं वैशिष्ट्ये म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणं आणि तिसरं वैशिष्ट्ये म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणं हे होय.” या आशयाचे ट्विट मोदींनी केलं आहे.