औरंगाबाद : नवीन वर्षाचे स्वागत लोकांनी आपापल्या परीने केले. तर तिकडे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्यावेळी एका कपलचा व्हिडीओ समोर आला असून त्या व्हिडीओमध्ये धावत्या मोटरसायकलवर एक तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दुचाकी वेगाने धावत असताना तरुणी गाडीच्या पेट्रोल टँकवर चालकाकडे तोंड करुन बसलेली आहे. गाडीवरील तरुण तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ या दुचाकीच्या बाजूने जाणाऱ्या एका गाडीमधून शूट करण्यात आला आहे.
खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचा KISSING सीन, VIDEO व्हायरल pic.twitter.com/emBkiFCQQc
— The मराठी Medium (@MarathiMedium) January 3, 2022
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा सर्व प्रकार औरंगाबाद शहरामधील आहे. व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा असून यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ असताना, अनेक गाड्या आजूबाजूने जात असताना हे दोघे धावत्या दुचाकीवर समोरासमोर बसून एकमेकांचे चुंबन घेत होते. दुचाकीवरील हे दोघे नक्की कोण आहेत, यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
प्रेमाच्या नावाखाली हे तरुण तरुणी स्वत:सोबतच रस्त्यावर चालणाऱ्या अनेकांचा जीव धोक्यात घालत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा मुर्खपणा असून या दोघांवर कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी काहींनी सोशल नेटवर्किंगवरुन केली आहे.