नवी दिल्ली – आपल्या छायाचित्रात बदल करून वेबसाईटवर अपलोड करून त्रास देण्याचा आणि मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार एका महिला पत्राकराने पोलिसांत शनिवारी दाखल केली. त्यानंतर उजव्या विचारसरणीच्या कडव्या कार्यकर्त्यांकडून ही वर्षभरात दुसऱ्यांदा घडलेली घटना असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
There is an online auction of hundred women There are so called Dharm Sansads , advising the army the police n the people to go for the genocide of almost 200 MLN Indians .I am appalled with every one ‘s silence including my own n particularly of The PM . Is this Sub ka saath ?
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 3, 2022
त्याची दखल घेत या ऍपवर बंदी घालण्यात येईल आणि त्याचा समन्वयाने तपास करण्यात येईल, असे ट्विट माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री उशीरा केले.
एका ऑनलाईन न्यूज पोर्टलला काम करणाऱ्या या महिलेने या प्रकरणात गुन्हा तातडीने नोंदवावा, अशी मागणी केली आहे.
याच मुद्यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. जावेद अख्तर म्हणाले, महिलांचा ऑनलाइन लिलाव होत आहे, धर्म संसदेत २० कोटी भारतीयांच्या हत्याकांडाची चर्चा होत आहे. काय हेच सर्वांचा साथ सर्वांचा विकास आहे ?
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,’शेकडो महिलांचा ऑनलाइन लिलाव होत आहे, तथाकथित धर्म संसदे आहेत, जे लष्कराला आणि लोकांना सुमारे 200 एमएलएन भारतीयांच्या नरसंहारासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत.माझ्या स्वतःच्या आणि विशेषत: भारतीयांसह प्रत्येकाच्या मौनाने मी घाबरलो आहे. पीएम यांचा हाच’ सब का साथ आहे का ?’ PM मोदी या गप्प का बघत ? असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, समाज माध्यमे आणि इंटरनेटवर मुस्लिम महिलांना त्रास देण्याचा आणि त्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती समुहावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुलीबाई डॉट गितहब डॉट आयओ या वेबसाईटवर माझा फोटो पाहून सकाळी मला धक्काच बसला. त्यावर माझे छायाचित्र अयोग्य स्वरूपात, अस्वीकारार्ह रुपात आणि अत्यंत चुकीच्या पध्दतीने वापरले होते. या मागे मी आणि माझ्या सारख्या स्वतंत्र आणि पत्रकार महिलांना त्रास देण्याच हेतू स्पष्टपणे दिसतो, असे या फिर्यादीत म्हटले आहे.