पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर 75 लाख रूपयांची मालमत्ता आहे. नितीशपुत्र निशांत हे वडिलांपेक्षा जवळपास पाचपटीने अधिक श्रीमंत आहेत. नितीश सरकारने बिहारमधील सर्व मंत्र्यांना दरवर्षाच्या अखेरच्या दिवशी संपत्ती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. त्यातून स्वत: नितीश आणि इतर मंत्र्यांनी संपत्तीचा तपशील जारी केला.
नितीश यांच्या नावे 16.51 लाख रूपयांची जंगम, तर 58.85 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, निशांत 1.63 कोटी रूपयांच्या जंगम आणि 1.98 कोटी रूपयांच्या स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. बिहारमधील बहुतांश मंत्री नितीश यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. त्यांच्या संपत्तीचा तपशील बिहार सरकारच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.