जिनिव्हा – पुण्यातील सीरम इन्स्टिटुट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्होव्हॅक्स या करोना प्रतिबंधात्मक लसीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स या कंपनीने शोधलेल्या या लसीमुळे गरीब राष्ट्रातील लसीकरणाला बळ मिळू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
विषाणूच्या नव्या आवृत्तीतही ही लस मोठे आजारपण आणि मृत्यू या पासून संरक्षण देऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख मेरीअँजेला सिमाव यांनी म्हटले आहे. गरीब असणाऱ्या 41 राष्ट्रांत 10 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले आहे. तर 91 राष्ट्रात 40 टक्के लसीकरण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.