आळंदी – भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती ह.भ.प पंडित महाराज नागरगोजे ट्रस्ट ज्ञानज्योत धर्मशाळा आळंदी येथे सामाजिक बांधीलकीतून साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विलास सांगळे होते.
याप्रसंगी डॉ नारायण जायभाये, प्राचार्य हभप पांडुरंग महाराज मिसाळ, अॅड. संदीप जायभाये, अॅड. एम.एस. नाडे, समर्थ केकान, धीरज घोळवे, निलेश सानप, माऊली काळे, सचिन कांदे, भिकाजी घुले, सुमंत सानप, वैभव घुगे, गजानन नागरे आदि उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त १९ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी विलास सांगळे यांनी केले. डॉ नारायण जायभाये, प्राचार्य हभप पांडुरंग महाराज मिसाळ यांनी मान्यवरांच्या जीवन कार्याचा परिचय करून देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी नितिन नवनाथ सांगळे, भाजपा कायदा आघाडी पुणे जिल्हा सहसचिव अॅड. एस. एस. आघाव, आदित्य सांगळे, वंजारी सेवा संघ आळंदी शहर अध्यक्ष महादेव मिसाळ, माऊली थोरवे, बाळासाहेब पालवे, विशाल सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. एस.एस. आघाव यांनी केले.