नवी दिल्ली : शरीराच्या संपूर्ण पोषणासाठी, निरोगी आणि पौष्टिक आहार घेणे सर्वात महत्वाचे मानले जाते. विशेषत: हिवाळ्याच्या काळात तापमानात झपाट्याने घट होत असताना, अशा परिस्थितीत शरीराला अंतर्गत उष्णता आणि ऊर्जा पुरवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. आयुर्वेद तज्ञांच्या मते हिवाळ्यात सर्व लोकांनी रोज गुळाचे सेवन केले पाहिजे. गूळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला नियमितपणे ठराविक प्रमाणात आवश्यक असतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की गुळात ब जीवनसत्त्वे, थोड्या प्रमाणात प्रथिने आणि फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. विशेषत: हिवाळ्याच्या काळात गूळ खाण्याचे अनेक संभाव्य फायदे आहेत यात आश्चर्य नाही. चला तर, जाणून घेऊया गूळ खाण्याचे असेच काही आरोग्यदायी फायदे.
* शरीर डिटॉक्स करते
जर्नल ऑफ फूड केमिस्ट्री मध्ये प्रकाशित 2009 च्या अभ्यासानुसार, गुळातील अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे त्याला सायटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म देतात, याचा अर्थ असा की ते केवळ फुफ्फुसातील श्लेष्मा साफ करू शकत नाही तर आतून श्वसन आणि पाचन तंत्र देखील स्वच्छ करू शकतात. रोज गूळ खाल्ल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
* गूळ पोटासाठी फायदेशीर
सामान्यतः जेवणानंतर मिठाई म्हणून गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आतडे निरोगी ठेवण्याबरोबरच पाचक एन्झाईम्स वाढवण्यास मदत करते. अभ्यास दर्शविते की ज्यांना बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या असतात त्यांच्यासाठी गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते.
* रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
आरोग्य तज्ञांच्या मते, कोणतेही अन्न जे पोषक तत्वांनी भरलेले असते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील चांगले असू शकते. यामुळेच गूळ हा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा सर्वोत्तम पदार्थ मानला जातो. हिवाळ्यात गुळाचे सेवन जास्त केले जाते. हे शरीराला सर्दी, फ्लू आणि इतर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील उपयुक्त आहे.