मुंबई – शून्य प्रहाराला गरजेच्या वस्तूंची भाववाढ आणि महागाई यावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला दिला. लोकसभेतील सुप्रिया सुळेंच्या या भाषणाचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत आहे.
@supriya_sule ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट @AjitPawarSpeaks यांना द्या. ते तुमच तरी ऐकतात का पाहू pic.twitter.com/MQnJxhFG3b
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 10, 2021
यावरून आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंच्या या मागणीवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंच्या मागणीचं एक वृत्त पोस्ट करत त्यावर ट्वीट केलं आहे. “सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्रानं अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू”, असं केशव उपाध्येंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.