मुंबई – “विस्पोट’, “काबिल’, “मुंबई सागा’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या संजय गुप्ताने आता एका वादग्रस्त विषयावर सिनेमा बनवायचे ठरवले आहे. हा एक बायोपिक असणार आहे.
मुंबईतील अतिशय वादग्रस्त आणि पॉप्युलर बार डान्सर स्वीटीच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. स्वीटी ही अशी बार डान्सर होती जिने आपले लिंग परिवर्तन केले होते.
स्वीटी अगोदर “तो’ होती. मग तिने आपले लिंग परिवर्तन करून “ती’ झाली होती. या वादग्रस्त बायोपिकचे नाव “टोपाझ’ असणार आहे. स्वीटी ज्या बारमध्ये डान्स करत होती त्या दक्षिण मुंबईतील बारचे नाव टोपाझ होते.
एका महिलेच्या वेषात त्याने केलेल्या परफॉर्मन्सवर जगभरातील दर्शक फिदा झाले होते. हा कालावधी 1980 ते 1990 दरम्यानचा होता. याच डान्समुळे स्वीटी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
या सिनेमाचे डायरेक्शन समित कक्कड करणार आहे. या बायोपिकच्या कथेचे धिकार निर्मात्यांनी दोन वर्षांपूर्वीच मिळवले आहेत. मात्र, आता प्रत्यक्ष तयारीला सुरुवात झाली आहे.