पुणे -आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींसाठी मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, मागील एक महिन्यात जिल्ह्यात 2 लाख 51 हजार मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवले आहे. यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 8 हजार 727 नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात 74 हजार 994 अणि ग्रामीण मधील 10 मतदारसंघात मिळून 67 हजार 504 इतक्या मतदारांनी नाव नोंदविले आहे. पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मतदानाचे टक्केवारीचे प्रमाणही जास्त असते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने मतदार यादी प्रमाणीकरण व अद्ययावतीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नव्याने मतदारनोंदणी, दुबार मयत अशी मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता आदींमधील दुरुस्ती आणि स्थलांतर असेल तर त्या मतदारसंघात नाव नोंदवणे अशी कामे करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात या मोहिमेत नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला आहे. याविषयी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत यांनी माहिती दिली. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष नोंदणी अधिकाऱ्यांकडे नाव नोंदणीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघ मिळून 2 लाख 51 हजार 225 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर मतदारसंघ नवे मतदार कसबा पेठ 3,232 पुणे कॅन्टोन्मेट 5,819 हडपसर 33,629 पर्वती 6,469 खडकवासला 23,894 कोथरूड 16,447 शिवाजीनगर 2,893 वडगावशेरी 16,344 पिंपरी-चिंचवड मतदारसंघ नवे मतदार भोसरी 27,101 पिंपरी 17,409 चिंचवड 30,484 ग्रामीण मतदारसंघ नवे मतदार जुन्नर 5,147 आंबेगाव 2,657 खेड 3,397 शिरूर 11,622 दौंड 5147 इंदापूर 3593 बारामती 3071 पुरंदर 14,975 भोर 11,241 मावळ 6654