मुंबई – आपला शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठेसाठी वणवण करावी लागते. कधी-कधी पिके योग्य वेळी बाजारात न नेल्याने एकतर पीक खराब होते किंवा त्याला खर्चानुसार
भाव मिळत नाही. मात्र, शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी करावी लागणारी भटकंती आता थांबू शकते. सरकारने “कृषी उडान योजना 2.0′ नावाची योजना सुरू केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणखी मदत होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आणि त्याचे पीकही योग्य वेळी बाजारात पोहोचेल. या योजनेंतर्गत पीक
थेट बाजारपेठेत नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, आंतरराष्ट्रीय महामार्ग आणि हवाई मार्गाची मदत घेतली जाते. या योजनेमुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची समस्या कमी होणार आहे. या योजनेचा लाभ कसा घेता येईल ते पाहूया.
काय आहे कृषी उडान योजना 2.0?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. या योजनेंतर्गत देशाच्या विविध भागांतून कृषी उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी विमानतळांचा वापर केला जाईल. विमानातील निम्म्या जागांवर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
जेणेकरून शेतकऱ्याला अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागणार नाही आणि उत्पादने योग्य वेळी बाजारात पोहोचतील. जे शेतकरी मत्स्य उत्पादन, दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसासारखे व्यवसाय करतात, त्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळू शकतो.
या योजनेचे फायदे
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दूरवरच्यार् े ठिकाणीही आपला माल विकण्याची संधी मिळणार आहे. डोंगराळ भागात राहणारे शेतकरी आपला माल बाजारात सहज विकू शकतात. जे आदिवासी आहेत आणि त्यांची उत्पादने योग्य वेळी बाजारपेठेत न पोहोचल्याने खराब होतात, त्यांना याचा चांगला फायदा होईल.
हवाई वाहतुकीने उत्पादने आणणे व नेणे यामुळे व्यवसायही वाढेल आणि शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळेल. एएआयद्वारे संचालित या योजनेसाठी देशातील 53 विमानतळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत देशाच्या ईशान्येकडील राज्यांना हवाई मार्गाने देशातील उर्वरित बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- पत्त्याचा पुरावा
- बॅंक पास बुक
- जमिनीची कागदपत्रे
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम कृषीचे अधिकृत संकेतस्थळ रसीळर्लीर्श्रीीींश.र्सीें.ळप वर लॉग इन करा.
- होम पेजवरच तुम्हाला कृषी योजनेचा पर्याय दिसेल.
- कृषी उडान योजनेचा अर्ज उघडेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि
- पीक संबंधित माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरावी लागेल.
- फॉर्म भरल्यानंतर सबमिट करा.
- आता तुमचा कृषी योजनेचा अर्ज पूर्ण झाला.