अहमदाबाद – गुजरातमधील द्वारकामध्ये एकदा एटीएसने ड्रग्ज प्रकरणी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली गेली. एटीएसने 24 किलो ड्रग्ज जप्त केले होते. जप्त केलेल्या या ड्रग्जची किंमत सुमारे 120 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होती.
याच प्रकरणात आता ड्रग्जमाफिया अवैध धंद्यांची, ड्रग्ज, अफीमच्या तस्करीसाठी शाळकरी मुलांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. शाळेत शिकणाऱ्या ९ वर्गातील एका मुलाला अफीमची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली की,’ ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडे तब्बल 2 किलो अफीम आढळून आले. हा शाळकरी मुलगा राजस्थानातून सुरतला अफीमची तस्करी करण्यासाठी आला होता. या मुलाबाबत पोलिसांना टीप मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जाळे विणले अन् अखेर त्या 16 वर्षांच्या शाळकरी मुलाला निओल चेक पोस्ट येथून अटक करण्यात आली.
या मुलाने तपास सांगितले कि, गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने हा अफीम राजस्थानमधून सुरतला पाठविण्याचे सांगितले होते. यासाठी त्याला ५ रुपये मिळणार होते. त्याच्या बॅगतील वॉटर बॉटलमधून 1.980 किलो अफीम आढळून आला.अफीमची बाजारात किंमत 1.98 लाख रुपये आहे. पोलीस मुख्य आरोपी गोपाल शर्मा याचा शोध घेत आहे.