बारामती, (प्रतिनिधी) – बारामतीतील ज्येष्ठ व्यापारी सुरेंद्र माणिकलाल मुथा यांचे नातू मीत स्वप्निल मुथा यांनी १० वी आय.सी.एस.इ बोर्डात ९९.४० % गुण मिळवून बारामतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑल इंडिया रॅंकमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. बारामतीने हा मान प्रथमच मिळवला आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर या शाळेतील ९९.४० % हे आजपर्यंतचे सर्वाधिक मार्क्स मीतने मिळविले आहेत.
बारामतीतील युवा उद्योजक व जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सुरेंद्र मुथा यांचा मीत हा चिरंजीव आहे. या यशाबद्दल मीत व कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.