पुणे – प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन पुणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी खडकी रेल्वे स्टेशनवर टर्मिनल विकसित करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केली. बापट यांनी याविषयी पत्रकारांना माहिती दिली. बापट यांनी कामकाज नियमावलीतील लोकसभेच्या अध्यक्षांनी निवेदन दिले असून, ते पटलावर घेण्यात आले. पुणे स्टेशन येथील वाढत्या गर्दाचे विकेंद्रीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही खासदार बापट म्हणाले आहे.
पुणे स्टेशनवर गर्दी का ?
पुणे हे भारतातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण केंद्र आहे. ते देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवाशांना आकर्षित करते. त्यामुळे खूप गर्दी झाली आहे. पुणे रेल्वे स्टेशनची गर्दी कमी करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जवळच्या रेल्वे स्थानकांना टर्मिनल म्हणून विकसित करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
खडकी स्टेशन येथे वाव
खड़कों हे पुणे शहराच्या मध्यभागी रेल्वे स्थानक आहे. तेथे विस्तारासाठी जमीनदेखील उपलब्ध आहे. खडकी रेल्वे स्थानक टर्मिनल म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अभ्यास करण्याची गरज आहे. असे खासदार गिरीश बापट म्हणाले.
मालवाहतुकीचाही भार
पुणे स्थानक येथून मालवाहतुकीच्या ट्रेन्सची संख्या मोठी आहे. यातून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे. त्यामुळे खडकी येथे टर्मिनल विकसित केल्यास मालवाहतूक, स्टोअरेजचाही प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अन्य पर्याय अडचणीचे : हडपसर येथे रेल्वे
टर्मिनल उभारणीचे काम कासवगतीने होत आहे. त्यात उपलब्ध जागा हा प्रमुख अडथळा आहे. तर, शिवाजीनगर येथेही रेल्वे स्थानकावर जागेअभावी टर्मिनल म्हणून विकास होण्यास विलंब होत असून, प्रवाशांना अडचणी येत आहेत.
पुणे स्टेशन महत्त्वाचेच
पुणे हे मध्य महाराष्ट्र आणि मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. येथे मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातून दक्षिणेकडे जाणान्या ट्रेन्ससाठी थांबा आहे. गोवा आणि कर्नाटकातून उत्तरेकडे जाणाऱ्या ट्रेन्सला थांबा म्हणूनही पुणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे येथे नियोजन करण्याची गरज आहे.
खडकी येथे टर्मिनल उभारणीसाठी अधिकाऱ्यांना व्यवहार्यता तपासण्याचे आणि खडकी रेल्वे स्टेशन येथे टर्मिनल विकसित करण्यासाठी आराखडा सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे लोकसभा अध्यक्षांना केली आहे. याबाबत लवकरच कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. – गिरीश बापट, खासदार, पुणे