उद्योजकआणि तरुण व्यावसायिकांचा जागतिक समुदाय असणाऱ्या डेलाली डर्सक्लब (डीएलसी) ने शिक्षणाचेमाहेरघरअसणाऱ्या पुण्यात त्यांच्या पुणे चॅप्टरचे उदघाटन पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्तेपार पडले.
जगातील पहिले बिझनेस प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जाणाऱ्या डीएलसीच्या पुणे चॅप्टरच्या उदघाटना वेळी पुणे महानगरपालिकाआयुक्त,श्रीविक्रमकुमार, प्रधान आयकर आयुक्त- पुणे, श्रीअशोककुमारपांडेआणिSBI चेस्वतंत्रसंचालक – डॉ. गणेशनटराजनउपस्थितहोते.
उद्योजकांना “A life of Success to a life of Significance” रूपांतरित करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्याचे उद्दिष्ट डीएलसीचे आहे. डीएलसीहा असामंच आहे की जो विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रात मजबूत बाठबळ देण्याचे काम करते. उद्योजकांसाठी औद्योगिक क्षेत्रातील माहितीची देवाण घेणाव, लाइफस्टाइल कोचिंग व सामाजिक जबाबदारीवर यावर डीएलसीचे अधिक लक्ष केंद्रितआहे.या जागतिक समुदायाच्या जगभरात शाखा असून २६पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ येथे सदस्य आहेत.
यावेळी डेलालीडर्स क्लबचे संस्थापक,श्री.जिमीमिस्त्रीम्हणालेकी,“डीएलसी पुणे चॅप्टरची आज सुरुवात होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. डीएलसीचा उद्देश उद्योजकांना आणि तरुणव्यावसायिकांना भविष्यातील योग्य व्यावसायिक संस्था तयार करण्यात आणि जगात आपल्या व्यवसायाचा प्रभाव पाडण्यास मदत करणे हा आहे.
आजच्या उद्योजकांना फक्त त्यांचा व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष न देता, उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातआणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देताना इतरांना मदत करणे ही गरजेचे आहे. याच सकारात्मक बदलासाठी डीएलसी आपले योगदान देत आहे व एक उत्प्रेरक होऊ इच्छितआहे“.
डीएलसी ग्लोबल कम्युनिटीमध्ये आज २२५०हून अधिक प्रतिष्ठिपुरुष आणि महिला सहभागीआहेत. जे २६पेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ सदस्यांशी१५ग्लोबल चॅप्टरमधून जोडले आहेत. हे १५ग्लोबल चॅप्टर जगातील न्यूयॉर्क, लंडन, दुबई, हाँगकाँग, बँकॉक, सिंगापूर, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, इन्दोर, आणि अहमदाबाद येथे आहे.