आता तापसीच्या आणखी एका चित्रपटचा फर्स्ट लुक समोर आला आहे. या चित्रपटाचे नाव “वो लडकी है कहां’ असे आहे. यात तापसीसोबत प्रतीक गांधी मुख्य भूमिका साकारत आहे. ही जोडी प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
फर्स्ट लुक पोस्टरमध्ये तापसी आणि प्रतीक हे कोणाला तरी शोधत असल्याचे दिसत आहे. यात तापसी पन्नू पोलीसच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या हातामध्ये एक नकाशाही दिसत आहे. दुसरीकडे प्रतीक गांधी हा नवरदेवाच्या गेटअपमध्ये हातात दुर्बीण घेऊन उभा असल्याचे दिसतेय.
चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तापसी पन्नूने पोस्टमध्ये लिहिले की, “प्रतीक गांधी आणि मी जंगली पिक्चर्स आणि रॉय कपूर फिल्म्सच्या आगामी कॉमेडी ड्रामा “वो लडकी है कहां’मध्ये त्याच्या बेपत्ता पत्नीचा शोध घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पहा, चित्रपटाचा फर्स्ट लुक.’ दरम्यान, सोशल मीडियावर सध्या हे पोस्टर खूपच व्हायरल झाले आहे. यावर असंख्य चाहत्यांनी कमेंटस् करत ते रीपोस्ट देखील करत आहे.