साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सातारा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र एसटी महामंडळाला यावर तोडगा काढण्यात अद्याप तरी यश आले नाही. असे असताना रोज एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासात कामावर हजर राहण्याचा वेळ देण्यात आला आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. याशिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र तरीही यावर तोडगा निघण्याचे कोणतेही चिन्ह दिसून येत नाही आहेत. असे असताना सातारा जिल्ह्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे.

संतोष वसंत शिंदे, वय 34 राहणार आसगाव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते मेढा एसटी डेपोत सेवेत होते. घरची परिस्थिती नाजूक असणाऱ्या संतोष यांनी तीन वर्षापुर्वी मेढा एसटी डेपोत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र अपुऱ्या पगारामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येत गेला यामुळे ते तणावाखाली गेले. दरम्यान काल रात्री संतोष यांना त्रास होत असल्याकारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.