सितारादेवी यांच्या नृत्य कौशल्याबाबत आताच्या पिढीने केवळ ऐकले आहे. त्यांच्या कलेचे किस्से खूप प्रसिद्ध होते. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर नृत्य सादर केल्यावर टागोरांनी त्यांना नृत्यसम्राज्ञी अशी उपाधी दिली होती. बॉलीवूडमध्ये या महान नृत्यांगनेवर बायोपिक बनवला जाणार असल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली आहे. सितारादेवींच्या 101 व्या जयंती निमित्ताने राज आनंद मुव्हीजने या बायोपिकची घोषणा केली आहे.
या बायोपिकमध्ये सितारादेवींनी बनारसमध्ये घेतलेल्या कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणाला केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. बनारसला आल्यापासून धन्नोपासून सितारादेवी बनण्याचा प्रवास या सिनेमात दाखवला जाणार आहे. सितारादेवींची कन्या जयंती माला मिश्रा या करणार आहेत. तर या सिनेमाची स्क्रिप्ट सितारादेवींचे पुत्र रणजीत बारुत हे लिहीत आहेत.
संपूर्ण सिनेमात संगीत सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळेच या सिनेमाला संगीत देण्याची जबाबदारी ऑस्कर विजेत्या ए. आर. रेहमानवर सोपवण्यात आली आहे. या बायोपिकसाठी मुंबईमध्ये कलाकारांची ऑडिशन सुरू झाली आहे, असे त्यांचे नातू आणि कथ्थक कलाकार पंडित विशाल मिश्रा यांनी सांगितले.