टोकियो – राजघराण्याच्या सोयी-सुविधा सोडून साध्या माणसाशी लग्न करणारी जपानी राजकन्या आपल्या पतीसह रविवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कला रवाना झाली. देशात नवविवाहित जोडप्यावर बरीच टीका होत आहे. राजकुमारी माको कोमुरो आणि तिचा पती केई कोमुरो टोकियोच्या हनेदा विमानतळावरून न्यूयाॅर्कला रवाना झाले. माको आणि केई दोघे एकमेकांवर खुप प्रेम करतात. त्याच प्रेमापोटी माकोने राजवाडा सोडून त्याच्यासोबत 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
केई कोमुरो काय करतो?
केई कोमुरो हा फोर्डहॅम युनिव्हर्सिटी लॉ स्कूलचा पदवीधर आहे. तो न्यूयॉर्कमधील एका लॉ कंपनीत काम करतो. त्याने गेल्या महिन्यात टोकियोमध्ये लग्नाची नोंदणी केल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, ‘मला माको आवडते आणि तीच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे.
– याआधीही राजकन्यांना सोडावे लागले आहे घर
जपान अनेक प्रकारे आधुनिक आहे, परंतु कौटुंबिक संबंध आणि स्त्रियांच्या स्थितीबद्दलचे बरेच नियम काहीसे कालबाह्य आहेत, ज्याचे मूळ सरंजामी प्रथा आहे. राजकन्येने सामान्य व्यक्तीशी लग्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे आणि त्या राजकन्याही राजभवन सोडून गेल्या आहेत. पण माकोचे प्रकरण हे पहिले आहे ज्यावर इतका वाद झाला आहे आणि लोकांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या नियमामुळे माकोला आलिशान राजवाडा सोडून आता अमेरिकेत 1 बीएचके अपार्टमेंटमध्ये पतीसोबत राहावे लागणार आहे.
माको ही सम्राट नारुहितोची भाची आहे. नारुहितोनेही सामान्य स्त्री मसाकोशी लग्न केले होते. सध्याचे सम्राट यांचे वडील आणि माजी सम्राट अकिहितो हे राजघराण्यातील पहिले सदस्य होते ज्यांनी सामान्य स्त्रीशी लग्न केले होते. त्यांच्या सम्राट वडिलांच्या कारकिर्दीत जपानने दुसरे महायुद्ध लढले होते, ज्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जपानमधील राजेशाही प्रतीकात्मक आहे आणि त्यांच्याजवळ कोणतीही राजकीय ताकद नाही.