नवी दिल्ली – द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व टीम इंडियाचे महान कोच तारक सिन्हा यांचे आज निधन झाले आहे. सिन्हा यांचे निधन दिर्घ आजाराने झाले आहे. मृत्यूसमई ते 71 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट द्वारे दिली आहे. सिन्हा यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिडा विश्वात शोककळा पसरली आहे.
Legendary coach Tarak Sinha passed away at 3 an this morning. he was ailing for some time. Om Shanti 🕉️ pic.twitter.com/AFJDwZl6r9
— Vijay Lokapally 🇮🇳 (@vijaylokapally) November 6, 2021
टीम इंडियाचे कोच राहीलेल्या तारक सिन्हा यांच्या कोचिंग कारकिर्तीमध्ये 12 क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तर 100 पेक्षा जास्त क्रिकेटपटू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत. सिन्हा यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक क्रिडापटूंनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर धवन, रिंदर खन्ना, रंधीर सिंह, रमन लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आशीष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा आणि ऋषभ पंत हे 12 खेळाडू टीम इंडियाकडून खेळले आहेत. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटूंमध्ये अंजूम चोप्रालाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.