मुंबई – गुरुवारी संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करण्यात आली. सेलेब्सनीही हा सण त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासह साजरा केला. अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ आणि अभिनेता ‘अर्जुन कपूर’ या दोघांनी दिवाळीत चांगलीच धमाल केली आहे.
मलायकाने कपूर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. अनिल कपूर यांच्या घरी दिवाळी पार्टी झाली. या पार्टीत मलायका बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत पोहोचली. यावेळी मालयकाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
तर अर्जुन कपूरने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दिवाळी पार्टीत मलायका अतिशय हॉट अँड ग्लॅमर्स दिसत होती. अर्जुन कपूरसोबत तिने जबदस्त पोझ दिल्यात. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
असून, फॅन्सने सुद्धा लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव केला आहे. हे दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत.