पारगाव – पारगाव – नानगाव हद्दीत भीमा नदीपात्रात मगरीच्या हल्ल्यात पारगाव येथील शेतकरी विजय दशरथ जगताप यांची जर्सी गाय जखमी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जगताप ते नदीकाठी जनावरे चारत असताना एक गाय पाणी पिण्यासाठी नदीपात्रात गेली होती. पाण्यातून बाहेर आली असताना ती गंभीर जखमी झाली होती. तिच्या शरीरातून रक्तस्त्राव येत होता.
दुसऱ्यादिवशी या घटनेपासून 500 मीटर अंतरावर पाणी पिण्यासाठी शेळ्या गेल्या होत्य. त्या पुन्हा वेगाने नदीपात्रातून बाहेर आल्या. त्यावेळी जगताप यांनी पाहिले.
मगराने पाण्याबाहेर डोकावत असल्याचे त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले आहे. वनविभागाचे नानासाहेब चव्हाण व अडागळे यांनी या ठिकाणी पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली आहे.