शिरूर शहरात निषेध मोर्चा : आरोपींवर कारवाई करा
शिरूर – शिरूर -हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राव्दारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. धमकी देणाऱ्याचा तात्काळ शोध घेऊन आमदार पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी
केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संतोष भंडारी, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे रवींद्र काळे, ऍड. प्रदीप बारवकर, महिला राष्ट्रवादीचे विद्या भुजबळ, संगीता शेवाळे, शहराध्यक्ष सौदामिनी शेटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रंजन झांबरे, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे,
माजी संचालक जगनाथ पाचर्णे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग कर्डिले, हरिदास कर्डिले, सुरेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, अबिद शेख, तुकाराम खोले, शिरूर रामलिंगचे सरपंच नामदेव जाधव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. किरण आंबेकर, भाजपाचे विजय नरके, शिवसेनेचे मयुर थोरात, आपचे शहराध्यक्ष अनिल डांगे, मनसेचे अविनाश घोगरे, सुशांत कुटे, रवी गुळादे, बंडु दुधाने, सर्वपक्षीय व संघटनांचे तालुक्यातील स्थानिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे. शिरुर शहरात दहशतीचे वातावरण झाले असून त्या निनावी पत्र लिहिणाऱ्या लोकांचा तपास करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तालुकाध्यक्ष काळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्याकडे केली आहे.
यावेळी नगरपरिषद ते पोलीस ठाण्यापर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढून निषेध केला. यावेळी संतोष भंडारी, मुजफ्फर कुरेशी, विनोद भालेराव, सुभाष पवार, राजेंद्र जगदाळे, विश्वास ढमढेरे, विद्या भुजबळ, मयुर थोरात यांसह कार्यकर्त्यांनी निनावी पत्राचा निषेध करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांना केली आहे.