पुणे- लग्नाच्या खरेदीसाठी परगावावरुन पुण्यात आलेल्या एका कुटूंबाची तीन लाखाची रोकड आणी 50 हजाराच्या साडया रिक्षात विसरल्या. मात्र डेक्कन पोलिसांनी काही तासातच रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्यांची रोकड व व साड्या परत मिळवून दिल्या. ऐन लग्नाच्या तोंडावर घडलेल्या घटनेने कुटूंबाला धक्का बसला होता. मात्र डेक्कन पोलिसांनी वेळीच मदत केल्याने कुटूंबाने त्यांचे आभार मानले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवारी विश्वजित दिलीपराव पवार (रा मणे राजुरी ता तासगाव ) हे त्यांचे मित्र पंकज माणिकराव जमदाडे यांच्यासोबत लग्नाचे कपडे खरेदीसाठी पुण्यात आले होते. खरेदीनंतर ते जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलात कुटुंबासोबत थांबले नाष्टा करण्यासाठी थांबले होते.
यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी खरेदी केलेल्या साड्या ( अंदाजे 55000 रु किंमतीच्या) व रोख तीन लाख रुपये असे रिक्षा मध्ये विसरून राहिले. ही बाब लक्षात आल्यावर ते डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले. त्यांना रिक्षा नंबर आठवत नसेलेने तात्काळ डेक्कन पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल बर्डे व तांबे यांनी डेक्कन पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून रिक्षा क्रमांकाबाबत खात्री केली.
यानंतर पोलीस नाकाबंदी ऍपवरून रिक्षाचालकाचे नाव व पत्ता चेक केले असता तो सुदेश घोलप (रा गणेश मंदिर घोरपडी बाजार) असा मिळाला. त्यावरुण रिक्षाचालक हे खराडी येथे राहत असलेबाबत माहिती व मोबाईल क्रमांक मिळाला.
मोबाईलवर संपर्क साधून त्यांना खराडी येथे भेटून रिक्षा मध्ये विसरून राहिलेले साड्या व रोख रक्कम रिक्षाचालकाडून ताब्यात घेऊन रोख रक्कम व इतर साहित्य डेक्कन पोलीस स्टेशन येथे आणले. रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पावसे यांचे हस्ते सदर तक्रारदार यांचे ताब्यात सुखरूप देण्यात आले.