पुणे – दसऱ्याच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडील मोबाइल चोरट्यांनी लांबविल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात नुकतीच घडली. दसऱ्याच्या खरेदीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात दोन दिवसांपूर्वी दिनेश जांभळकर (वय ५१, रा. बुर्केगाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि त्यांचा भाऊ अनिल आले होते. फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
चोरट्यांनी जांभळकर यांच्या खिशातील ११ हजारांचा मोबाइल लांबविला. फूल बाजारात खरेदीसाठी आलेल्या आणखी एका नागरिकांचा दहा हजारांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. मार्केट यार्डात फूल बाजारात खरेदीसाठी आलेल्या आणखी काहीजणांचे मोबाइल चोरट्यांनी लांबविले. मात्र, अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या नाहीत. पोलीस उपनिरीक्षक ए.व्ही. कदम तपास करत आहेत.