मुंबई – करोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करता आला नाही. मात्र यंदा करोनाची परिस्थीती आटोक्यात आली असून सेनेचा दसरा मेळावा साजरा करण्यात येणार आहे. यावरून नितेश राणे यांनी सेनेवर जहरी टीका केली आहे.
"मी नाही त्यातली, कडी लावा आतली”
या नाटकाचा special प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ?
Can’t wait 😛
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) October 15, 2021
नितेश राणे म्हणाले की, “मी नाही त्यातली, कडी लावा आतली” या नाटकाचा special प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ? अशी अंत्यत टोकाच्या भाषेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.
शिवसेना व शिवसैनिकासाठी दसरा मेळावा अत्यंत महत्वपुर्ण मानला जाणारा उत्सव आहे. या उत्सवाला बाळासाहेब ठाकरेंपासूनची परंपरा लाभली आहे. मात्र करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून हा उत्सव शिवसैनिकांना साजरा करता आला नाही. त्यामुळे या मेळाव्याचे यावर्षी आणखीच महत्व वाढले आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.