पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेंज हिल प्रभाग क्रमांक 6 महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या रोहिणी गणेश बोरसे यांनी हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांना लसीकरणाच्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, लवकरच महिलांसाठी सेकंड डोस लसीकरणाचा शिबिर राबवण्यात येईल, असे सांगण्यात आले. याशिवाय, महिलांचे असलेले सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन या मेळाव्यात दिलेले आहे.