पुणे – गणेशोत्सवाच्या कालावधीत नाविण्यपुर्ण व नियमांचे पालण करुन उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा समर्थ पोलीस ठाण्याच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सव व पैगंबर जयंतीनिमीत्त बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी रेखचित्रकार गिरीश चरवड आणि सायकलपटू प्रिती म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, समर्थ पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी व अंमलदार, नवरात्र व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
समारंभ दरम्यान रेखाचित्रकार गिरीश चरवड यांनी त्यांनी काढलेल्या रेखाचित्रवरुन पोलीसांना तापासामध्ये कशाप्रकारे मदत होत आहे व कशी मदत झाली, त्याचप्रमाणे रेखचित्र काढताना येणारे अडचणी कशा निर्माण होतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायकलपटू प्रिती म्हस्के यांनी शरिर तंदुरुस्त व सदृढ राहणेकरीता व कामाच्या ताणतणावातुन वेळात वेळ काढुन व्यायाम करणे किती फायद्याचे आहे व व्यायामुळे आलेला थकवा कशाप्रकारे दूर होतो याबाबत मार्गदर्शन केले. महिला पोलीस अधिकारी ज्योती कुटे व सायकल पट्टू प्रिती म्हस्के यांचा त्यांच्या कामगिरीनिमीत्त समर्थ पोलीस ठाण्याकडून सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव काळात दिलेल्या सुचनांचे पालन करुन उत्तमरित्या शिस्तबध्द असे गणेशउत्सव साजरा केलेल्या हिंद माता तरुण मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, बनकर तालीम संघ, गोसावीपुरा मित्र मंडळ, अश्विनी मित्र मंडळ, अपोलो तरुण मंडळ , गणेश तरुण मंडळ , साखळी पीर तालीम, खडीचे मैदन मित्र मंडळ, विक्रम मंडळ, जय बजरंग कबड्डी संघ , आझाद तरुण मंडळ या मंडळांना मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.